जालना क्राईम

जालन्यात पोलिसांवर प्राणघातक हल्ला ;दोन पोलीस जखमी

जालना- शहराला लागून असलेल्या बदनापूर तालुक्यातील खादगाव परिसरात  औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये सिद्धार्थ ऍग्रो प्रॉडक्ट, या नावाने सोयाबीनपासून कच्चे तेल निर्मिती करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात काल सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास काही तरुणांनी खंडणीची मागणी केली, आणि ती न दिल्यामुळे कंपनीतील साहित्यावर हल्ला करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली, त्यामध्ये केबीनच्या काचा फुटल्या.

images (60)
images (60)

या प्रकरणानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदंनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी कंपनी गाठलीअसता या हल्लेखोरांनी पोलिसांवर देखील प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सिद्धार्थ ऍग्रो प्रॉडक्ट या कंपनीमध्ये जगदीश रामकिसन राचरलावार, वय 61,गोकुळ नगर नांदेड,  व्यवस्थापक म्हणून गेल्या तीन वर्षापासून काम पाहत आहेत. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते कंपनीत काम करत असताना खादगाव येथील पप्पू घोरपडे, नवनाथ नाईकवाडे ,तेजराव खंडेकर हे तिघे जण कंपनीच्या गेटवर आले आणि वाचमन महेश काजळे याच्यासोबत हुज्जत घालून कंपनीच्या कार्यालयात आले. त्यानंतर जगदीश यांच्यासोबत वाद घालून खंडणीची मागणी करू लागले .परंतु जगदीश यांनी खंडणी देण्यास नकार दिला त्यामुळे वरील तिघांनी कंपनीच्या कार्यालयातील काचाची आणि अन्य साहित्याची नासधूस केली आणि मारहाण केली. दरम्यान केबिनमध्ये आरडाओरड झाल्यामुळे प्लांट इन्चार्ज संदीप
देमेवार राजू जाधव, घनश्याम नाईकवाडे , पळत आले आणि त्यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळीही तिघेजण तेथून निघून गेले.जाता जाता कंपनीतील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार  व्यवस्थापक जगदीश यांनी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. दरम्यान ही माहिती चंदंनजिरा पोलिसांना मिळताच संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस या कंपनीत गेल्या  जाई पर्यंत ते आरोपी पुन्हा कंपनीत आले आणि  आरोपींनी पोलिसांना तुम्ही कशाला आले? हे आमचे आपापसात भांडणे आहेत, असे म्हणत तेथून निघून जाण्यास सांगितले .

पोलिसांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वरील आरोपींनी पोलीस कर्मचारी श्री. वेताळ आणि प्रभाकर वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रभाकर वाघ यांच्या हाताला जखम झाली आहे तर वेताळ यांच्या छातीवर चाकूचा वार लागलेला आहे. वेताळ सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील तीन आरोपींविरुद्ध चंदंनजिरा पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला करणे आणि खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी  एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. अन्य दोन जण फरार आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!