जालना जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
जालना / प्रतिनिधी
जालना तालुक्यातील बाजी उम्रद येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नितीन बबनराव डोंगरे शालेय अध्यक्ष बाजी उम्रद संजय डोंगरे, प्रकश डोंगरे ,पांडुरंग डोंगरे, कृष्णा डोंगरे, भारत डोंगरे ,पपु डोंगरे ,शेख सर,भालकर ,दांडेकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन जालना,दि.12 :- जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, सुहास देशमुख श्रीमती वैशाली दिघोळे, श्रीमती एस.यू. यशवंतकर, श्रीमती पी.ए.गायकवाड, आर.डी. गोशिंगे, संतोष गायकवाड, श्रीमती कुंदा पाटील तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कुंभार पिंपळगाव-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कुंभार पिंपळगाव हा तर्फे राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती एस एम एस अकॅडमी येथे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हा सहसंयोजक अंकिता कासट शरद विक्रम राऊत चाफाकानडे किशोर मोरे राम राऊत विशाल काळे उन्नती भुसारे आदी उपस्थित होते.
शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, मूर्ती येथे, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
कुंभार पिंपळगाव:-
कोविड -19 संसर्ग टाळण्याच्या हेतुने सामाजिक आंतर ठेवुन व मास्कचा वापर करुन ,आज दि.12/01/2022 वार बुधवार रोजी, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, मूर्ती.ता. घनसावंगी. जि. जालना. या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानदेव सोळंके यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. विष्णू नागरे यांची उपस्थिती होती.यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन – कार्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूञसंचलन श्री.विष्णु भाबट यांनी केले तर आभार श्री शहादेव नाडे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.