जालना जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने घेतला हा निर्णय
जालना प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने राज्यातील शाळा, कॉलेज बंद केले होते. मात्र आता सोमवारपासून (दि.24) सरकारने शाळा, कॉलेज सुरु करण्यास हिरवा कंदील दिला असून याबाबतचा निर्णय स्थानिक जिल्हा प्रशासनाने घ्यावा अशी अट सरकारने घातली आहे.
सोमवारपासूून जिल्ह्यातील शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी तर ग्रामीण भागातील 1 ली ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या शाळा, कॉलेज सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने संमती दिली आहे.
याबाबतची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे शाळा सुरू करतांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत, शाळेतील 15 ते 18 वयोगटातील विद्याथ्यांच्या लसीकरणाबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच सुरू होत असलेल्या शाळा बाबत गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा, शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सुचनांचे संबंधित शाळांनी काटेकोरपणे पालन करावेे, असे देखील या परिपत्रकात म्हटले आहे.