जालना जिल्हा

दारू विकून सरकार चालवणार का? – आ. लोणीकर

images (60)
images (60)

जालना प्रतिनिधी
राज्य सरकारने दारू विक्री बाबत घेतलेल्या नवीन निर्णयाचा आमदार बबनराव लोणीकर यांनी निषेध केला आहे. दारू विकून तुम्ही सरकार चालवणार आहात का, असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे.राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट अशा ठिकाणी दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचा निषेध करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही दारू विकून सरकार चालवणार आहात का? की लोकांच्या संसाराची होळी करणार आहात?  असा सवाल आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे.फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असा निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असे देखील लोणीकर यांनी यावेळी म्हटले.  राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!