जालना जिल्हा
अंदाजपत्रकनुसार काम होत नसल्याने ग्रामस्थांनी पाडले रस्त्याचे काम बंद !
कुंभार पिंपळगाव :- घनसावंगी तालुक्यातील लिंबी ते मुर्ती फाटा ह्या अडीच किलोमीटर चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी संदर्भित रस्त्याचे काम शनिवारी दुपारी थांबवले आहे.
रस्त्याचे कामात जागोजागी खड्डे पडले आहेत,तर अनेक ठिकाणी पूल करणे अंदाजपत्रकात असतानाही पूल बनवले नसल्याने व हे अंदाज पत्रक नुसार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ,व त्यामुळे जोपर्यंत काम चांगल्या दर्जाचे होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचे गावकरी माजी सरपंच कैलास तौर, शहाजी तौर, सतिश तौर,प्रमोद तौर,ऋषी तौर, बापूसाहेब तौर, विनोद तौर,बालासाहेब कदम,दिपक तौर,भुषण तौर, निलेश वाघमारे,राजुभैय्या तौर, अमर तौर, आदीने केला आहे.