जालना क्राईम
jalna: महिला व बाल रुग्णालयातून चक्क नवजात बाळाची चोरी
जालना: जालन्याच्या (Jalna) शासकीय महिला व बाल रुग्णालयातून (hospital) रात्री जन्मलेल्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने काल प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात (Women and Children ) दाखल करण्यात आले होते. रात्रीच्या ११ वाजेच्या सुमारास या महिलेने गोडस अशा मुलाला जन्म दिला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून हा तपास सुरु करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेने शासकीय महिला व बाल रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. वार्डातून बाळाची चोरी झाल्याने रुग्णालय परिसराच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.