२१५ वर्षाची अखंड पंरपरा जपणारे पिंपरखेड एक गाव
न्यूज जालना ब्युरो
लोकसंस्कृती लोप पावत चालला असताना मातीशी व माणसाशी ईमान राखून सांस्कृतिक परंपरा जोपासन्याचे काम मागील दोनशे तेरा वर्षापासून अखंड चालू आहे.आज महाराष्ट्रात ग्रामीण नाट्य-परंपरा जवळपास मोडकळीस आली आहे.ती परंपरा जोपासण्याचे काम एका गावात आजही अविरत चालू आहे…त्या गावचे नाव
” पिंपरखेड ” बु|| हे
गावं जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात दक्षिण दिशेस गोदावरी परिसरात वसलेलं गावं..
” .महारुद्र जन्मोत्सवा-निमीत्त येथे दुस-या
दिवशीपासून प्रतिवर्षी नाट्यमहोत्सव सुरु होतो. “येत्या एप्रीलला सीता-स्वयंवर ” या परंपरेच्या संगीत नाटकाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे .हे नाटक प्रतिवर्षी परंपरेने करावेच लागते.अंदाजे दोनशे तेरा वर्षापुर्वी या महोत्सवास सुरुवात झाली असा नाट्यसंहीतेत ऊल्लेख आहे.सर्व मराठवाड्यात फक्त पिंपरखेड याच गावी हा आगळावेगळा परंपरेने चालत आलेला महोत्सव चालु आहे.पुर्वीच्या काळी जुनी मंडळी टेंभे लावून दिव्याच्या प्रकाशातव पञ्याचे शेड ऊभारुन नाट्यप्रयोग करत असत.ध्वनीयंञणाही नव्हती.1980 च्या नंतर गावात वीज आली.यानंतर ध्वनीयंञणा व उजेडाच्या प्रकाशात प्रयोग होऊ लागले.या रंगभूमीचे वैशिष्टय असे आहे की,अशिक्षित कलावंतानीही अभिनय करुन सेवा केली आहे.आजही काही पाञे वारसा चालवतात.या महोत्सवाचे वेशिष्टय म्हणजे रंगभूषा,वेशभूषा,केशभूषा व हार्मोनियम(संवादिनी)तबला,टाळ,झांज व साथसंगत ही पंरंपरेने आजही गावकरीच करतात.आजही ती परंपरा चालू आहे.आज मंडळाचे स्वतःचे मालकीचे भव्य रंगमंदिर आहे.तीर्थक्षेञ ‘क’ मध्ये गावचा समावेश झाल्यामुळे शासनाचे अनुदान प्राप्त होताच नविन रंगमंच अत्याधुनिक सोयीयुक्त बांधकाम होणार आहे.
या महोत्सवाला या गावाबरोबरच बाहेरगावची व पंचक्रोशीतील मंडळी हजेरी लावतात.प्रत्येक घरी पाहुणे-मंडळी आवर्जुन येतात.या गावच्या माणसाने कलेला लोकाश्रय तर दिलाच पण देणगीच्या रुपात राजाश्रय देऊन ही परंपरा अखंडित चालू ठेवण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.या गावातील कोणत्याही कलावंताने कुठलेही प्रशिक्षण न घेता,या जुन्या मंडळीने चालवलेला कलेचा वारसा डिजीटल युगात नविन पिढीही हा वारसा समर्थपणे चालवते आहे.येथील प्रत्येक माणसाचे अंगी कलाकाराचे गूण आहेत.परंपरेने सेवा करण्याचे काम आजही अव्याहत सुरु आहे.संगीत,ऐतिहासीक,पौराणिक
व तमाशाप्रधान,सामाजिक व कौटंबिक नाट्य कलावंत सादर करतात.हा वारसा जतन करण्याचे या गावक-यांचे प्रयत्न खरोखरंच कौतुकास्पद आहेत.यातील सीता स्वयंवर,बाणासुर व भीष्मपर्व ही संगीत नाटके ही गावच्या पुर्वजांनीच लिहीलेली आहेत.याची लिखीत प्रत आजही हस्तलिखीत स्वरूपात आहे आजही येथील पुरुष कलावंतच स्ञी पाञ साकारतात.या गावातआजही मुस्लीम धर्मीय कलावंत वारसाने नाटकात सहभागी होउन सेवा करतात.या गावात नोकरीच्या निमीत्ताने सअथिर झालेला कर्मचारीही या कलेच्या प्रेमात पडून कलावंत ईधी झाला हे कळले नाही.येथील शिक्षकांनीही नाट्यसेवा केलेली आहे.फकीर नावाचे तलाठी अध्यात्मीक वृत्तीचे होते.त्यांनी साकारलेली ” लावणी भुलली अभंगाला ” या नाटकातील संत तुकारामांची साकारलेली भूमिका आजही आठवणीत आहे.
बदलत्या काळाबरोबर महोत्सवही आता बदलत चालला आहे.संगीताचा वापर आता संगीत नाटक वगळता रेडीमेड स्वरुपात होत आहे.परंतु अजुनही संगीत नाटकाचे नाट्यपद(साकी)अजूनही मूळ संगीता-व्दारे सादरीकरण होते.या गावचे प्रती बालगंधर्व म्हणून परिचीत असलेले धोंडीरामजी भाऊ सानप हे उत्कृष्ट गायन करुन सेवा देतात.तबला साथसंगत काशीनाथजी जोशी,हार्मोनिअम(संवादिनी)साथसंगत नामदेव आरडे व लक्ष्मण जोशी व सहकारी देतात.आज संपुर्ण महाराष्ट्रात अशी परंपरा व नाट्यपदे(साकी)स्वरचीत आणि चालीही स्वरचीत हा अनमोल ठेवा (पेटेंट)कुठेच नाही.याचे जतन व संवर्धन व्हायला हवे.आणि ते संपुर्ण महाराष्ट्राला कळायला पाहीजे हीच कामना आहे.
या नाट्य महोत्सवाचे पाईक व पितामह कै.अच्युतराव कुलकर्णी यांचे घराण्याची पुढील पिढीही बहादुरकाका व ऊमेश कुलकर्णी हे सुञधाराचे काम करत आहेत.याबरोबरच कै.दासोपंत कुलकर्णी,कै.अंबादास जोशी,कै.नामाजी देवकाते कै.अंजीरामजी आघाव कै.बाबुराव सानप यांच्याबरोबर श्री.संपतराव देवकते,श्री.रावसाहेब काका पाटील,श्री.रामरावदादा सानप यांचे मार्गदर्शनाखाली नाट्यमंडळ कार्यरत आहे.
या गावात अशी आख्यायीका आहे की,जोपर्यंत ही नाट्यसेवा अखंड चालु राहील तोपर्यंत गावांवर कोणतेही नैसर्गिक संकट अथवा विघ्न येणार नाही.हे खरे आहे की आजपर्यंत या गावात कधीही शेतकरी आत्महत्या झाली नाही.दुष्काळ पडला तरी संकट उत्पन्न झाले नाही.महापुराचे संकट निर्माण झाले नाही.गारपीटीने नुकसान झाले नाही.गाव हे समृध्द आहे.ही पांडुरंग व महारुद्राची कृपा आहे.अशी गावक-यांची धारणा आहे.