देश विदेश न्यूज

इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी 38 जणांना फाशीची शिक्षा

images (60)
images (60)

अहमदाबाद:-

जुलै 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा जाहीर केली आहे. न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची तर इतर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी ही शिक्षा सुनावली आहे.दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी 8 फेब्रुवारीला सर्व निर्णय देताना सर्व 49 आरोपींना दोषी ठरवले होते. न्यायालयाने 77 पैकी 28 आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या 49 आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार न्यायालयाने आज निर्णय दिला असून 38 जणांना फाशी तर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2008 मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते.

या स्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 जण जखमी झाले होते. 26 जुलै 2008 रोजी हे बॉम्बस्फोट झाले होते. 26 जुलै 2008 ला झालेल्या 21 साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. याआधी 2 फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल येणार होता. पण न्यायमूर्ती ए.आर.पटेल यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे 8 फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 8 फेब्रुवारीला सर्वांना दोषी ठरवण्यात आले. 26 जुलै 2008 रोजी फक्त एका तासात 21 बॉम्बस्फोट झाले होते. अहमदाबाद पोलिसांनी याप्रकरणी 20 तर सूरत पोलिसांनी 15 गुन्हे दाखल केले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!