नगरपालिकेतील बांधकाम विभागच बंद करण्याची मागणी
जालना / प्रतिनिधी
जालना नगरपालीका प्रशासनातील बांधकाम विभाग बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे करण्यात आली आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
नगरपालीका मागील तीन
वर्षापासुन तीन विभाग चालवत आहे. ज्यामध्ये जालना नगरपालीका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व जीवन प्राधीकरण विभाग या तीन संस्था आहेत. या तिनही विभागाचा ताळमेळ नसल्यामुळे जालना शहरातील जनता त्रस्त झालेली आहे. जालना शहरातील रस्ते,भुमिगत गटार योजनेचे बांधकाम मागील तीन वर्षापासुन बांधकाम विभाग सांभाळत आहे.
त्याच्या विभागामार्फत जी काही कामे चालु आहेत त्यात नगरपालीकेला काहीही माहिती नसते, या कामाकडे ना नगरपालीका लक्ष देते ना सार्वजनिक विभाग लक्ष देतो. त्यामुळे कामे सुमार दर्जाची होत असून पालिका प्रशासनातील बांधकाम विभाग बंद करण्यात यावा अशा आशयाचा एक निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक रमेश देहेडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले आहे. या निवेदनावर रसना देहेडकर, रमेश देहेडकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.