घनसावंगी तालुका

जांबसमर्थ येथे रामदास नवमी उत्साहात साजरी ;विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न.

घनसावंगी प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम व समर्थ रामदास स्वामी मंदिरात रामदास नवमी शुक्रवारी (दि.25) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान रामदास स्वामी मंदिरात ता.23 ते ता.25 पर्यंत श्रीमत् दासबोध ग्रंथाचे चक्रीय पारायण झाले, गुरुवारी (ता.24) रात्री साडे आठ ते अकरा यावेळेत हभप आरतीताई खंडागळे चिंचखेड यांचे कीर्तनसेवा झाली


शुक्रवारी पहाटे काकड आरती, शाश्वत पूजा, अभिषेक नंतर गावांतून भिक्षा फेरी काढण्यात आली. सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत समर्थ भक्त योगेश महाराज साळेगावकर यांचे समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्रावर प्रवचन झाले नंतर साडेबारा वाजता श्रींच्या महाआरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


सरपंच रामकीसन तांगडे यांच्यावतीने समर्थ मंदिरात तर श्रीराम मंदिरात परमेश्वर बारहाते यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला..यावेळी समर्थ मंदिरचे सचिव महेश साकळगावकर, विश्वस्त राजकुमार वायदळ, श्रीराम मंदिराचे व्यवस्थापक धनंजय देशपांडे , ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप पांडुरंग महाराज आनंदे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. दिवसभर समर्थ दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!