जालना जिल्हा

जालन्यात काँग्रेसचे एकही झाड उगु देणार नाही; माजी राज्यमंत्री खोतकर यांचा दावा

जालना प्रतिनिधी
जालन्यात काँग्रेसचे एकही झाड उगु देणार नसल्याचा दावा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये दि. 8 मार्च रोजी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

images (60)
images (60)

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, पंडीत भुतेकर, युवासेना विस्तारक अभिमन्यू खोतकर, माजी शहर प्रमुख बाला परदेशी, आलमखान पठाण, शेख जावेद, शेख नजीर, जफर खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना खोतकर म्हणाले की, जनतेने मोठ्या विश्वासाने जालना नगर पालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती दिली मात्र टक्केवारी दिल्याशिवाय विकास कामे पुर्ण होत नसल्याचा अजेंडा हाती घेतल्यामुळे शहराचा सर्वांगीन विकास होऊ शकला नाही.

स्वतःच्या कार्यकर्त्यांचे काम देखील टक्केवारी घेतल्याशिवाय करत नसणाऱ्यांनी दुसऱ्याला नाव ठेवू नये असा टोला आ. गोरंट्याल यांचे नाव न घेता खोतकर यांनी यावेळी लगावला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!