गुंज येथील उपोषणकर्ताची तब्येत खालावली ;प्रशासनाचे दुर्लक्ष

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील पानंद रस्त्यासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्त्यांची ६व्या दिशी देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा उपोषण कर्त्यानेयांनी सांगितले.आज दिनांक 12 रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ.काजळे यांनी उपोषणकर्त्यांची आरोग्य चाचणी केलीअसता, त्यामध्ये २ उपोषणकर्ताची परिस्थितीची चिंताजनक बाब समोर आली आहे.त्यामध्ये विष्णू चव्हाण व गोविंद सोळुंके यांची परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजळे यांनी सांगितले.
या उपोषणाला आज रविवार रोजी सात दिवस उलटून गेले तरी अद्यापही उपोषण सुटलेले नाही. सुरू असलेले उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवली असून दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. परंतु रस्त्याचा प्रश्न निकाली लागल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्णय या उपोषणकर्त्यांनी घेतला.