जालना जिल्हा

विविध योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांनी तातडीने मार्गी लावावेत- जिल्हाधिकारी

जालना / प्रतिनिधी
विविध महामंडळे आणि विविध  ‍विभागांचे  शासकीय  योजनेतील  लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांनी तातडीने मार्गी लावावेत. या अनुषंगाने  या वर्षी  दिलेले उदिष्ट बँकांनी तातडीने  पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना दिले.

images (60)
images (60)


जिल्हास्तरीय बँकर समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडली.  यावेळी  जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  प्रेषित मोघे आदींसह  सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.


प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी  चालू वर्षातील  विविध शासकीय विभाग व महामंडळे यांच्यामार्फत लाभार्थ्यांसाठी  राबविण्यात  येणाऱ्या  योजनांच्या अनुषंगाने बँकांमार्फत  मंजूर करावयाचे प्रस्ताव याबाबतचा  सविस्तर आढावा घेतला.


विविध विभाग व महामंडळे यांच्यामार्फत  राबविण्यात येणाऱ्या योजना या सामाजिक योजना असल्याने  बँकांनी याबाबतचे लाभार्थ्यांचे प्रस्ताव जबाबदारीने व तातडीने मार्गी लावावेत याबाबत कुठल्याही प्रकारची दिरंगाई करु नये, अशी सूचना  जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!