अन् मोदी झाले वारकरी, देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देहू प्रतिनिधी
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावं. यासाठी पुण्यातील देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल, असं म्हणत होकार दिल्याची माहिती विश्वस्थांनी दिली. देहू देवस्थानच्या अध्यक्षांसह सात विश्वस्थ पंतप्रधांना निमंत्रण देण्यासाठी दिल्ली दरबारी गेले होते.
यावेळी मोदींना तुकोबांची पगडी, गाथा, मूर्ती, विना, चिपळी, तुळशीचे हार आणि शाल देत लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. देवस्थानने दिलेला सन्मान आणि निमंत्रण मोदींनी स्वीकारलं. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर माझे भाग्यच समजेन, असं म्हणत मोदींनी देहूत येण्याला होकार दिल्याची माहिती विश्वस्थांनी दिली.
पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यासाठी गेलेली ही तुकोबांची दहावी पिढी आहे. तुकोबांची शिकवण घेऊन आत्तापर्यंत या पिढ्यांनी सुरु ठेवलेलं, समाजहिताचं कार्य नक्कीच वाखण्याजोगं असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूनगरीत लवकरच येतील असा विश्वास विश्वस्थांनी व्यक्त केलाय.