जालना जिल्हामहाराष्ट्र न्यूज

अतिरिक्त संपूर्ण उसाचे मे अखेरपर्यंत गाळप पूर्ण होईल- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

जालना : मराठवाड्यातील  जालना, बीड, नांदेड जिल्ह्यांत अधिक ऊस  शिल्लक आहे. ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा येथे राबवून हा सर्व ऊस साखर कारखाने घेऊन जातील, त्यामुळे या जिल्ह्यातील अतिरिक्त संपूर्ण उसाचे मे अखेरपर्यंत गाळप पूर्ण होईल, अशी घोषणा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी (ता. १६ एप्रिल) केली. पवारांच्या या घोषणेमुळे मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे

images (60)
images (60)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे जालना दौऱ्यावर असून ते अंबड तालुक्यातील महाकाळा-पार्थवाला शिवारातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या कामाची शनिवारी (ता. १६) पाहणीसह आढावा घेतला. या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, आमदार विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, बी. बी. ठोंबरे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदींची उपस्थिती होती.

या वेळी पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या १०८ एकर क्षेत्राची पाहणी करून १५ एकर ऊस बियाणे लागवडीची पाहणी केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, की राज्यात साखर कारखाने वाढत आहेत. या वाढत्या साखर कारखान्याना उत्तम दर्जाचे ऊस बियाणे व कुलशल कामगारांची गरज आहे. त्याचा एक भाग म्हणून पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मराठवाड्यात पहिले केंद्र येथे होत आहे. या ठिकाणी ऊस बियाणे मळा व शेतकरी प्रशिक्षिण केंद्र, तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची व्यवस्था हे पुढील दोन ते तीन वर्षांत होऊन पुण्याप्रमाणे कृषी विभागाचे केंद्र येथे निर्माण होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!