आरोग्यदीप फाउंडेशनच्या “आरोग्यदर्शिकेचे “आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रकाशन

जालना:
गेल्या तीन वर्षापासून आरोग्यदीप फाउंडेशन राज्यभरात विविध सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहे . असंख्य मोफत वैद्यकीय शिबिर , आरोग्य तपासणी, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर, आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम लहान बालकांसाठी व वृद्धांसाठी आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहे .
संस्थेकडून यावर्षी आरोग्यदर्शिकेचे ग्रामीण व शहरी भागात वितरण करण्यात आले आहे .
या आरोग्यदर्शिकेचे प्रकाशन माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष डॉ.राहुल येवले, संस्थापक डॉ.महादेव सुरासे ,संस्थेचे व्यवस्थापकीय पदाधिकारी डॉ.सचिन जगदाळे डॉ.प्रदीप पवार, डॉ.अभिषेक यादव, प्रसिद्धी प्रमुख श्री.राहुल गायकवाड, अभिषेक आधुडे आधी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी श्री .राजेश टोपे यांनी आरोग्यदीपच्या विविध कामांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.