मोतीबाग तलावातील पाण्याची चोरी बंद करण्याची मागणी
जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील वैभव असलेल्या मोतीतलावातील गतवर्षी झालेल्या जोरदार पाऊसाने मुबलक मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे मात्र या पाण्यावर रात्रीच्या वेळी एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी संबधीत यंत्रणेला हाताखाली करुन पाणी उपसा गोंरखधंदा सुरु आहे विशेष म्हणजे 1 ते 2 महिन्यात गौतम बुद्धाची मुर्ती स्थापन होनार आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष कैलास रत्नपाखे यांनी प्रसिद्धी पत्र काढले या पत्रात म्हटले आहे मोती तलावातील गौतम बुद्धाच्या मूर्तीचि प्रश्न प्रलंबित पडला असुन नगर पालिका जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत आहे मोती तलावातील पाण्याची अवैधरीत्या एमआयडीसीच्या कंपन्यामध्ये सरास पणे रोज लाखो लीटर पाण्याची लुट होत आहे आमचा लढा गौतम बुद्धाच्या मूर्तीचा आहे अनेक सामाजिक संघटनेने पाठपुरावा केला आहे गौतम बुद्धाची मुर्तीचे काम लवकरच होनार असुन मोती तलावातील पाण्याची अवैधरित्या सर्रास पने विक्री होत आहे नगर पालिका प्रशासनाने लक्ष्य द्यावे नसता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर आदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष कैलास रत्नपाखे यांनी दिला आहे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.