जालना क्राईम

जालनात दरोड्यांचा प्रयत्न फसला;सालगावात दरोडेखोरांनी केला केला चाकूहल्ला

जालनात दरोड्यांचा प्रयत्न फसला;सालगावात दरोडेखोरांनी केला केला चाकूहल्ला

images (60)
images (60)

परतूर प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील सालगाव येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी घरात घुसून घरातील एकाजणाला चाकुने भोसकल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.घडली आहे. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परतुर तालुक्यातील सालगाव येथील वासुदेव नांनाभाऊ गाढवे आपल्या घरातील कंपाऊंडमध्ये झोपलेले असतांना रात्री 2 वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण गेटवरुन उडीमारून आत आले.

वासुदेव यांना मारहाण सुरू असतांना आरडाओरड ऐकून त्यांचा मुलगा कृष्णा बाहेर आला. बाहेर येताच तिघांपैकी एकाने कृष्णाच्या पोटात चाकूने भोसकले. या ठिकाणची आरडा ओरड एकूण गावातील लोक जागे झाल्याने या तिघांनी या ठिकाणावरून पोबारा केला. गावातील लोकांच्या मदतीने जखमी कृष्णा आणि वासुदेव यांना परतूर पोलीस ठाण्याला आणल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असतांना जालना येथील खाजगी रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टवार यांनी वासुदेव गाढवे यांची फिर्याद नोंदवून घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे करीत आहेत. डिवाएसपी राजू मोरे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जालना येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!