परतूर तालुका
योग शिक्षिका अनुपमा भारुका यांनी विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे
ll शास्त्री विद्यालयात जागतिक योग दिन साजरा ll
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षिका अनुपमा भारुका यांनी विद्यार्थ्यांना योग शास्त्रातील विविध प्रात्यक्षिके करून दाखविली.आजच्या धावपळीच्या जीवनात नियमित व्यायाम करणे, योगक्रिया करणे किती आवश्यक आहे याबाबतही भारुका यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक वसंतराव सवणे यांनी योगशिक्षिका अनुपमा भारुका यांचे स्वागत केले. यावेळी पर्यवेक्षक त्र्यंबक घुगे,राजकुमार राऊत यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.