जालना जिल्हा

आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात
येवू नये, सरकारने ओबीसीचा अंत पाहू नये – कल्याण दळे


जालना (प्रतिनिधी) ः  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येवू नये. या मागणीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, बहुजन परिषेदेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर झालेल्या जोरदार धरणे आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष कल्याण दळे यांनी रस्त्यावर उतरण्याचा केंद्र व राज्य सरकारला इशारा दिला आहे.
ओबीसी, व्हीजेएनटी, बहुजन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यात धरणे आंदोलन राबविण्यात आले. या अनुषंगाने जिल्हामध्ये परिषदेच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन संपन्न झाले.
आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यास ओबीसी समाजावर मोठा अन्याय होवून त्यांचे राजकीय व शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होईल. शेवटी हा समाज रसातळला पोहण्यास वेळ लागणार नाही. या बाबतीचीशासनाने  गंभीर दखल घेवून ओबीसींना त्वरीत न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष कल्याण दळे यांनी आपल्या भाषणातून केली.
जयंतकुमार बांठीया आयोगामार्फत ओबीसीचा इमपीरिकल डाटा गोळा करण्याचा प्रक्रियेतील त्रुटी दुर करण्यात याव्यात आणि आडनावाच्या आधारे ओबीसीचा इमपीरिकल डाटा गोळा करण्यात येवून नये त्यात ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.  यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात आणि ओबीसीचं हक्काचं आरक्षण मिळाल्याचं पाहिजे अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.  

images (60)
images (60)


एका शिष्टमंडळाने ओबीसीच्या समस्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना  सविस्तर निवेदन देवून राज्य आणि केंद्र सरकारला ओबीसीच्या मागण्यां पाठविण्यात यावेत अशी विंनती केली. या शिष्टमंडळामध्ये परिषदेचे कार्याध्यक्ष कल्याण दळे, राज्य समन्वयक राजेंद्र राख, शेख महेमूद, बाबुराव सत्कर, ॲड. राम कुऱ्हाडे, डॉ. प्रकाश इंगळे, प्रमोदकुमार रत्नपारखे, किशोर आगळे, धर्मा खिल्लारे, सुंदरलाल बगीनवाल, शिवप्रसाद चितळकर,रमेश यज्ञेेकर, मोहन इंगळे, नंदाताई पवार, सिंधुबाई वाघ, निलेश दळे, फकीरा वाघ, सुरेश सदगुरे, बाबा काळे, भागवत राऊत, विक्रम वराडे, लक्ष्मण कुमावत, डिंगबर पेरे, गजानन ढाकणे, सतिष सुरोसे, विठ्ठल गिराम, बाबासाहेब सोनवणे, संजय भालेराव, शिवाजी वाघ, विष्णु कदम, गणेश चांदोडे, बाबु सांळवे, बद्रीनारायण भसांडे, राजू पवार, बाळु दळे, आजिनाथ दळे आदी कार्याकर्त्यांचा समावेश होता.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!