कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन प्रशालेत कै.गोविंदभाई श्रॉफ यांची जयंती साजरी
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन प्रशालेत संस्थेचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण कै.गोविंद भाई श्राफ यांची आज (दि.२४) रोजी १११ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे,शालेय समितीचे सदस्य देविदास मिसाळ,जेष्ठ शिक्षक पद्माकर वाघरूळक,महेश बहाळकर,खुशालराव पवार यांच्याहस्ते गोविंद भाई श्राफ यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.प्रशालेची विद्यार्थींनी कु.किर्ती ठाकूर सहशिक्षक रत्नाकर लांडगे यांनी विचार मांडले.यावेळी मुख्याध्यापक मधुकर बिरहारे,पद्माकर वाघरूळक यांनी जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.आर.काळे यांनी केले. तर के.जी.भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.