घनसावंगी येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास शिवसैनिकांकडून प्रतिसाद
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना नेते सहसंपर्कप्रमुख डॉ.हिकमत उढाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान (दि.२७) बुधवार रोजी आयोजित करण्यात आले होते.या अभियानास घनसावंगी मतदारसंघातील शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.पहिल्या प्राथमिक टप्प्यात दोन हजार तीनशे शिवसेना पदाधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांचे सदस्यत्व नोंदणीचे प्रस्ताव व शपथपत्र तत्काळ शिवसेना भवन मुंबई येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती घनसावंगी शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव मरकड यांनी दिली.
यावेळी देवनाथ जाधव,हरिभाऊ पोहेकर, पंढरीनाथ उगले,पुंडलिक हेमके,सचिनराव देशमुख,प्रभाकर धांडे अनिरुद्ध शिंदे,राजू वाडेकर अण्णा वाडेकर,दिगंबर उगले वराडे,श्रीरंग वाघमारे,मधुकर साळवे,संभाजी उढाण,नंदकुमार उढाण, भागवत तांगडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.