घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव येथील जायकवाडी वसाहतीला उपविभागीय अधिकारी सुषमा अयाचित यांनी दिली भेट

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जायकवाडी वसाहतीला जायकवाडी पाटबंधारेच्या विभागात नव्याने रूजू झालेल्या उपविभागीय अधिकारी सुषमा प्रभाकरराव अयाचित यांनी आज (दि.१) वार सोमवार रोजी भेट देऊन शासकीय कार्यालयाची पाहणी केली.दरम्यान,त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घनसावंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव काळे, कृ.उ.बा.समितीचे संचालक लालासाहेब शिंदे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे घनसावंगी तालुकाध्यक्ष किशोर शिंदे,पत्रकार कुलदीप पवार,शाखा अभियंता मंगेश शेलार,प्रशांत देशपांडे,मोजणीदार मंगेश सोलाट,कालवा निरिक्षण दत्ता वाघमोडे,प्रकाश शिंदे, दिलीप राऊत,प्रल्हाद नाइकनवरे,जगदीश त्रिभुवन, शेख शबीर,ए.बी.बुरसे यांची उपस्थिती होती.