जालना जिल्हा

संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

जालना प्रतिनिधी /

images (60)
images (60)

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे आश्वासन देताच उघडले कुलूप

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने भर पावसात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर महिला प्रसूती झाल्याची घटना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ३० जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता घडली.हा प्रकार आरोग्य विभागासाठी अतिशय निंदनीय स्वरूपाचा असून नातेवाईक,ग्रामस्थ या घटनेबाबत दि.३१ जुलै रोजी आरोग्य केंद्रात गेले असता तिथे एका कुत्रीने तिन पिल्लांना जन्म दिलेला पाहयाला मिळाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्यानंतर आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी खरबडुन जागे झाले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर आरोग्य केंद्राचे कुलूप उघडले.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे संभाजीनगर-बिड,जालना-बिड राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अतिदक्षतामध्ये येते.परंतु आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधामध्ये अनियमितता आहे.वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या जागा रिक्त असल्याने रुग्णांची  सतत हेळसांड होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.

या आरोग्य केंद्राची सेवा ढेपाळल्याचे दिसून येत आहे.कर्मचाऱ्यांचे निवासस्थानेही कर्मचाऱ्याअभावी ओस पडले आहेत.रात्रीच्या वेळी तिथे कोणीच उपस्थित नसते.सर्व कर्मचारी सोयीनुसार अपडाऊन करत आहे.याचाही मोठा विपरीत परिणाम हा आरोग्य सेवेवर पडुन रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य व स्वच्छता निर्माण झाल्याचे पाहयाला मिळते आहे.

वडीगोद्री येथील रुपाली राहुल हारे या  महिलेला प्रसूती कळांचा त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्षात घेऊन आले.तेव्हा नातेवाईकांनी दवाखान्यात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व महिला आरोग्य सेविका उपस्थित नव्हती.तेव्हा खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर येताच रस्त्यावरच भर पावसात त्या महिलेची प्रसूती झाली.त्यानंतर डॉक्टर व कर्मचारी यांना फोन करुनही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रात्री येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा उपचार मिळत नाही.

या रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक वेळा रुग्ण हे गंभीर झाले आहेत.आरोग्य कर्मचारी हे स्थानिक राहत नाही.नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचारी यांना संपर्क करूनही एक तास कोणीही आले नाही.

त्यामुळे आज सकाळी ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली असता आरोग्य केंद्रात चक्क एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिल्याचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला कुलप ठोकल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर,सहाय्यक जिल्हा आरोग्य डॉ.अधिकारी गजानन म्हस्के,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कांगणे यांनी भेट देऊन झालेल्या गैरप्रकाराबद्दल संबधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना निवासस्थानी राहण्याचे सक्तीचे आदेश दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक आखून दिल्यानंतर आरोग्य केंद्राला लावलेले कुलूप अखेर उघडण्यात आले.यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थही मोठया संख्येने सहभागी झाले होते.उद्या सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासमोर गैरहजर कर्मचाऱ्यांची सुनावणी होईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल….जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर ■■

उद्या सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासमोर गैरहजर कर्मचाऱ्यांची सुनावणी होईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल….जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर

वडीगोद्री येथील महिलेची आरोग्य केंद्रातील कर्मचारी गैरहजर असल्याने भरपावसात आरोग्य केंद्राबाहेर रस्त्यावरच प्रसूती झाली आहे.तेव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी,अधिपरीचिका,आरोग्य साहयिका यांची उद्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासमोर सुनावणी ठेवली असुन त्या सुनवणीनुसार कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!