जालन्यात कौटुंबिक वादातून गोळी झाडून जवानांच्या आत्महत्याचा प्रयत्न
जालना : कौटुंबिक वादातून राज्य राखीव पोलीस दलातील एका ३५ वर्षीय जवानाने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जालना शहरातील एसआरपीएफ परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली
अनिल दशरथ गाढवे ( ३५ रा . जालना ) असे जवानाचे नाव आहे .अनिल गाढवे हे २०११ साली औरंगाबादहून जालना येथे बदली होऊन आले होते .
त्यांचा कौटुंबिक वाद सुरू होता मंगळवारी सकाळपासूनच ते निराश होते , असे पोलिसांन सांगितले . मंगळवारी ते तीन मित्रांसोबत ड्युटीवर होते . साडेतीन वाजेच्या सुमारास तिन्ही मित्र झोपी गेले . त्याच आनल गाढव यांनी रायफल धरून मानेजवळ गोळी झाडली . गोळीचा आवाज येताच , तेथील जवान तात्काळ उटले . त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली . नंतर गाढवे यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले .
डॉक्टरांनी तपासून त्यांना औरंगाबाद येथे रेफर केले आहे . माहिती मिळताच , सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव चेतली . घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती पोउपनि . राजेंद्र वाघ यांनी दिली .