राजाटाकळी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील छत्रपती शिवाजी राजे पब्लिक स्कूल येथे सोमवार (दि.१५) रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव" निमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक श्री किशोर सर आर्दड हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी चे नवनिर्वाचित सदस्य अच्युतराव आर्दड,गशेश बागडे,उपसरपंच श्री विष्णुपंत आर्दड हे होते. ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आर्दड,अंगद तौर, प्रवीणआर्दड,नंदु आर्दड, अर्जुन आर्दड,सुरेश, दशरथ आर्दड तसेच पालक व गावकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी म.गांधीजी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती मातेचे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे ध्वजारोहण शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक यांनी केले. शाळेतील विद्यार्थी विश्वा आर्दड,श्लोक आर्दड, ज्ञानराज आर्दड,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी यांनी मानले.