घनसावंगी तालुका

जालना जिल्ह्यात ह्या गावात पोळ्याच्या दिवशी बैलजोडीचा पाण्यात बुडुन झाला मृत्यू

जालना : धन्याच्या शेतात वर्षभर राबलेल्या जोडीला सजवून गावभर मिरवण्याची वेळ जवळ येत असताना घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या दोन्ही बैलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी अंत झाला . विशेष बाब म्हणजे शेतकरी या बैलांना धुण्यासाठी या खदाणीत घेऊन आला होता . पोळा सण साजरा करण्यासाठी काही तास उरलेले असताना डोळ्यासमोर बैलजोडीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने टाहो फोड होता .

images (60)
images (60)


घनसावंगी तालुक्यातील घोंशी बु . येथे ही दुखद घटना घडली . येथील शेतकरी सीताराम आव्हाड हे पोळ्यासाठी आपल्या बैलजोडीला सजवण्याआधी त्यांना धुण्यासाठी गावालगत असलेल्या खदाणीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास घेऊन गेले होते . घोंशी गावापासून ही खदाण एक किलोमीटर अंतरावर होती . दोन्ही बैल पाण्यात उतरल्यानंतर त्यातील एका बैलाच्या पायात कासरा अडकल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला . त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी सीताराम आव्हाड यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला . परंतु , कुणी मदतीला येईपर्यंत त्यांच्या दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .


आपल्या डोळ्यासमोर लाडक्या बैलजोडीचा अंत झाल्याने शेतकऱ्याने खदाणीत टाहो फोडला होता . आपल्या सर्जा राजाची जल्लोषात मिरवणूक काढण्याऐवजी त्यांना शेवटाचा निरोप देण्याची वेळ शेतकरी आव्हाड यांच्यावर आल्याने त्यांना दु : ख अनावर झाले होते . या घटनेमुळे गावात हळह व्यक्त होत आहे . बैल जोडीचा होता कुटुंबाला आधार शेतकरी सीताराम आव्हाड यांना दोन एकर जमीन आहे . बैलजोडीच्या मदतीने ते आपल्या शेतीबरोबरच दुसऱ्याच्या शेताची मशागत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे . परंतु , दोन्ही बैलाच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!