कुंभार पिंपळगाव: जळालेले तीन रोहित्र व किटकॅट केबल तत्काळ बसवा नसता महावितरणाला टाळे ठोकू-ग्रामविकास युवा मंचने दिला इशारा
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तीन रोहित्र जळालेले आहेत. त्यामुळे पिठाच्या गिरण्या बंद झाली आहे. पाण्याची समस्या निर्माण झाल्यास प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे जळालेले तीन रोहित्र केबल तत्काळ बसविण्यात यावे अशी मागणी ग्रामविकास युवा मंचच्या वतीने शनिवार (ता.२८) रोजी सहाय्यक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आगामी दिवस हे सण उत्सवाचे दिवस राहणार आहे.सरस्वती शाळा व ग्रामपंचायत परीसरातील तीन रोहित्र तीन महिन्यापासून जळालेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना विविध मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.जळालेले रोहित्र बसवून केबल तत्काळ बसविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. नसता दि.१ सप्टेंबर रोजी महावितरणला कंपनीला कुलूप लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ग्रामविकास मंचचे सुरेश कंटुले, भागवत राऊत,अक्षय बजाज,महावीर व्यवहारे,वैभव कुलकर्णी, दत्ता व्यवहारे ,दिनेश दाड,प्रशांत बुरशे,प्रताप कंटुले,अनिल दाड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत