जालना जिल्हा
आ. निलय नाईक,विधान परिषद सदस्य यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करा


महोदय महाराष्ट्रामध्ये सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री राहून गेलेले, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचे नातू श्री.निलय नाईक हे आपल्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार असून,आपणच आपल्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी बहाल केलेली आहे.महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज एक कोटी असून, समस्त बंजारा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, बंजारा समाजाची मागणी आहे की,आता महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये जे सरकार चालू आहे त्या सरकारमध्ये बंजारा समाजाचे काशी म्हणून ओळखले जाणारे पोहरादेवी येथील श्री.निलय नाईक आमदार यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावे आशी समस्थ बंजारा समाजा व राष्ट्रीय बंजारा परिषद जालनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्याम राठोड व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुकाराम राठोड,छबुराव राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड,नितीन पवार,संजय रंधवे,श्याम पवार,गोरख जाधव,रमेश पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गोरबंजारा धर्मपीठ चे सर्व संत-महंत तथा सर्व संघटना त्यांच्या बरोबर आहे.व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष आणि भूषण मा.श्री.किसनभाऊ राठोड असे अनेक मान्यवर यांच्या नेतृत्वामध्ये बैठक झाली असून, या बैठकीमध्ये सर्वांनी श्री.निलय नाईक यांना मंत्रिमंडला समाविष्ट करून घ्यावे असे ठराव एक मताने मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यात जागोजागी बैठक सुरू असून,बंजारा समाजामधून निलय नाईक यांना भारतीय जनता पार्टी सरकार व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार स्थापन झाले आहे यांच्या कोट्यामधून मंत्रीपद द्यावे.
सदर बंजारा समाजाच्या विकासाच्या दृष्टीने बंजारा समाजाला कुठेतरी आपल्या सरकारमध्ये स्थान मिळावं अशी मागणी जोर धरत आहे.याकरिता आपणास बंजारा समाजाच्या वतीने विनंती करत आहे की,मा.श्री निलय नाईक यांना कॅबिनेटमध्ये सामाविष्ट करून,बंजारा समाजाला सरकारमध्ये स्थान द्याल आणि समाजाच्या सर्वांगीण विकास दृष्टीने विचार कराल अशी आशा बाळगत आहे.