वादळी पावसामुळे ऊस झाला आडवा, समृद्धी शुगरचे चेअरमन बांधावर
![](https://newsjalna.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220904-WA0459.jpg)
वादळी वाऱ्यामुळे हजारो एकर ऊस भुईसपाट-शेतकरी चिंतेत
जालना प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला अंबड तालुक्यातील सुखापुरी ,ढाकलगाव वडीगोद्री , मंडळात आधीच कमी पाऊसामुळे मोसंबी पिकाची प्रचंड प्रमाणात फळगळ होऊन शेतकऱ्याचे नुकसान झाले होते तसेच सोयाबिन कापूस पिकांसाठी पाऊस कमी झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे अशा वेळेस शेतकऱ्यासाठी ऊस हेच पीक दोन पैसे मिळून देणारे होते परंतु प्रचंड प्रमाणात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ऊस आडवा झाला असून त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आसुन या आस्मानी संकटाशी कश्या पद्धतीने सामना करायचा या चिंतेत आहे काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सुखापुरी व वडीगोद्री येथील ऊस पिकाची समृद्धी व घृष्णेश्वर साखर कारखाण्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी पि.शिरसगाव येथे जाऊन प्रत्यक शेतावर जाऊन पाहणी केली
त्यावेळेस बोलतांना ते म्हणाले मोसंबी सोयाबीन कापुस पिकाचा विमा भरनाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन किव्हा टोलफ्री नंबर वर तक्रार करावी तसेच ऑफलाईन अर्ज भरून द्यावे म्हणजे विमा मिळवणे सोपे जाईल तसेच ऊस या पिकाचा कोणताही विमा नसल्यामुळे त्याच्या नुसकाणीसाठी मी दोन्ही साखर कारखान्याच्या ऊस तोडणी लवकर कशी व्हावी या दृष्टीने दोन्ही कारखान्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनां शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून कशाप्रकारे ऊस तोडणी चे नियोजन कसे करता येईल या बद्दल निर्देश दिले
शेतात ऊस आडवा पडल्यामुळे उसाला शेतकरी बांधवांनी नेहमी शेतात ओल राहील याची काळजी घ्यावी म्हणजे उंदरांचा त्रास कमी होईल कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच भाजपा शिवसेना सरकार शेतकाऱ्यांबद्दल अतिशय सकारात्मक असून संबंधीत प्रश्न मा, मुख्यमंत्री यांनां भेटून त्यांच्या निदर्शनाश आणुन शेतकऱ्यांना दिलासा देण्या बद्दल विनंती करू