अतिवृष्टी अनुदानातुन वगळलेल्या वडीगोद्री मंडळाला अनुदान द्या!

जालना प्रतिनिधी
- शिवसेनेची तहसील कार्यालयात ठिय्या देत मागणी.
खरीप हंगाम २०२२ मध्ये अंबड तालुक्यातील बहुतंश महसूल मंडळामध्ये सरासरी पेक्षा अधिक प्रज्यन्यमान होवून अतिवृष्टी झालेली आहे. शासन स्थरावर या अतिवृष्टीची नोंद होवून काही भागांमध्ये शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यात आलेला आहे. परंतु वडीगोद्री महसुल मंडळामध्ये वडीगोद्री. महाकाळा, अंतरवाली सराटी, नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी, दहेळा भांबेरी चुरमापुरी, अपेगाव, बळेगाव, साष्ठपिंपळगाव, टाका, रामगव्हान, दोदडगाव, दुनगाव, संदलगाव, धाकलगाव, गोरी, डोमलगाव, भागवान नगर, गहिणीनाथ नगर या भागामध्ये अतिवृष्टी झाले तरी पर्ज्यन्यमानाची नोंद ठेवणाऱ्या शासकीय संस्था महावेत तसेच महसूल व कृषी खात्याच्या नोंदीमध्ये तफावत निर्माण झाल्याने या भागातील शेतकरी फळबागा व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखिल शासकीय यंत्रणामधील गलथानपणाच्या कारभारामुळे अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत.
अंबड तालुक्यात इतर महसुल मंडळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु वडीगोद्री महसूल मंडळात सरासरी प्रज्येन्यमानापेक्षा ४६८ मि. मि. पेक्षा जास्त पाऊस होवूनही शासकीय यंत्रणांच्या चुकीमुळे शेतकरी अनुदापासून वंचित राहण्याच्या संतापजनक प्रकार होत आहे असे मत माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नोंदवले.
तसेच अंबड तालुक्यातील थकित पिक कर्जदार शेतकऱ्यांचे खाते सर्व राष्ट्रीय कृत बँकांनी होल्ड केलेली असल्याने सदरील शेतकरी अतिवृष्टी अनुदान, पिक विमा, पि. एम. किसान योजनेचे अनुदान यापासून वंचित राहात आहेत या बाबतही शासनाने शाखा अधिकारी यांना तात्काळ आदेश देवून होल्ड काढून शेतकऱ्याना न्याय मिळवून द्यावा अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात आला. यावेळी युवासेना सहसचिव विनायक चोथे, युवासेना विस्तारक भरत सांबरे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक बरडे, जिल्हाप्रमुख गणेश काळे, शहरप्रमुख नंदकिशोर पुंड, तालुकाप्रमुख सिध्दुसिंह राजे जऱ्हाड, ॲड. गणेश शिंदे, कल्याण टकले, दादासाहेब कदम, अर्जुन बाबा शेंडगे, अविनाश मांगदरे, सतिष धुपे, अभिजीत खटके, बद्रीनारायण शेर, अशोकराव खापरे, किशोरजी देखने, बाळासाहेब खंडागळे, पंडीतराव गावडे, मुकुंद हुसे, राजेंद्र हुसे, नंदकिशोर काळे, अॅड. शाम तिकांडे, सुदर्शन गावडे, अमोल टोप, अमोल ठाकुर, रविंद्र सांगुळे, दिनेश काकडे, अनिस तांबोळी, रामचंद्र गव्हाणे, बाळासाहेब रावसाहेब नटवे, रुपेश दिलीपराव मोहिते, सिताराम रमेश धुळे, कैलास नरसिंग जैस्वाल, यांची उपस्थिती होती