अंबड तालुकाघनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शिवसैनिकांनो विचलित होऊ नका,येणारा काळ आपला आहे-मा.आ.चोथे

images (60)
images (60)

कुलदीप पवार/प्रतिनिधी

आपण आज सर्वजण कोजागिरी साजरी करणार आहोत पण ज्यांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकून महाराष्ट्र आणि शिवसेनेचे दूध नासवलं त्या गद्दारांचे आणि भाजपचा जाहीर निषेध नोंदवतो अरे ज्या बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली रुजवली आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना मान व पान आणि ओळख निर्माण करून दिली त्या शिवसेनेवर आणि मातोश्रीवर तुम्ही सूड उगवत आहात तुम्हाला जनता जनार्दन आणि परमेश्वर कधी माफ करणार नाही तुम्हाला कोट्यावधी शिवसैनिकांचा शाप लागणार आहे हे लक्षात ठेवा दहा दहा पिढ्यांचे पैसे कमवून हरामखोरांनो तुम्ही शिवसेना संपवायला निघालात तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही तुम्ही आमचे चिन्ह गोठवलं पण आमच्या रक्त मात्र तुम्ही पेटवल हे लक्षात असू द्या घामाच्या पाणी आणि रक्ताचा सडा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही मिसळू पण पुन्हा एकदा जोमाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सत्ता काबीज करून दाखवू भाजपच्या नेत्यांना सांगू इच्छितो आमचा जीवावर महाराष्ट्रात मोठे झालात त्याच महाराष्ट्रात तुम्हाला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!