घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

विडिओ ..देवा तू सांग ना कुठे गेला हरवून: जांबसमर्थ मुर्ती चोरीचा रांगोळीतुन संदेश

Video

जालना प्रतिनिधी

images (60)
images (60)

श्री क्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील श्रीरामचंद्र , सीतामाता , लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तीची चोरी होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही . आज पर्यंत जांबसमर्थ येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारची आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे . गावकऱ्यांच्या भावना ह्या दिवसेंदिवस तीव्र होत चाल आहेत .

अशातच गौरी पूजनाचे औचित्य साधून जांब समर्थ येथील रहिवासी व जालना येथे कार्यरत असलेले कला शिक्षक सुधीर जोशी यांनी श्रीराम मंदिरातील गाभार्याची सुंदर अशी रांगोळी त्यांच्या राहत्या घरी रेखाटली आहे . ज्यात विना मूर्तीचा गाभारा दिसत आहे . श्रीराम मंदिरात जवळपास सहाशे वर्षापासून ऐतेहासीक महत्त्व असलेल्या मूर्तीची चोरी झाली तो आमचा इतिहास आम्हाला परत मिळावा आणि मंदिरात मूर्तीचा शोध लावून प्राणतिष्ठा व्हावी अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावावा असही ते या वेळी म्हणाले . यावेळी त्यांचे वडील श्रीधर जोशी , बंधू सचिन जोशी , कैलास तांगडे यांची उपस्थिती होती .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!