घनसावंगी तालुकाजालना जिल्हाराजकारण

चेअरमन सतिष घाटगे यांना शिंदे गटाकडून ऑफर राजकारणात उतरून घनसावंगीतून निवडणूक लढवावी-माजीमंत्री अर्जुन खोतकर

खोतकर यांच्या विधानाने तालुक्यात राजकीय चर्चांना ऊत

images (60)
images (60)

कुलदीप पवार /प्रतिनिधी

समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांनी राजकारणात उतरून आणखीन चांगली प्रगती करावी असे आवाहन माजीमंत्री तथा शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी गुरूवार (ता.आठ) रोजी समृद्धी गणेश फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात
बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांनी उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती केलेली असून त्याचबरोबर त्यांनी राजकारणात उतरून आणखीन प्रगती करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव घेवून आलो असून सतिष घाटगे यांना राजकीय आमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.यासाठी गणपती बाप्पा त्यांना सुडबुद्धी देऊन त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विघ्न दूर होतील.यावर त्यांनी विचार करावा असे खोतकर यांनी शेवटी सांगितले.यावेळी विविध सर्वपक्षीय मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती.
दरम्यान,खोतकर यांच्या विधानाने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून,अनेकांकडून याबाबत तर्क- वितर्क लावले जात आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे विरूद्ध हिकमत उढाण,सतिष घाटगे असा तिरंगा सामना रंगणार का.?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समृद्धी गणेश फेस्टिव्हल मध्ये मागील दहा दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले.उद्योग क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येत असतात.मात्र,खोतकर यांनी केलेल्या राजकीय विधानावर भविष्यात नक्कीच विचार करू.

सतिष घाटगे

चेअरमन

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!