जालना जिल्हा

युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल राऊत उद्या जालन्यात

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

याविषयी अधिक माहिती अशी की,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष कुणाल नितीन राऊत हे उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. बदनापूर तालुक्यातील देवगाव, खामगाव ,वंजारवाडी, बदनापुर येथे माझा गाव माझी शाखा अंतर्गत शाखा उघडण्याचा कार्यक्रम होणार असून जालना येथे सुद्धा सदर कार्यक्रम पार पडणार आहे.

जालना येथे शासकीय विश्रामगृहामध्ये दुपारी 12:00 वाजता कुणाल नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ.कैलास गोरंट्याल,जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,कार्याध्यक्ष राजेंद्र राख,शहराध्यक्ष शेख मेहमूद,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा जालना जिल्हा युवक काँग्रेस चे निरीक्षक मनोज कायंदे,सचिव अमर कुळे ,आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक पार पडणार असून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!