जळगाव येथील स्था.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करा
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
सकल मराठा समाज बांधवाची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
मराठा समाजाविषयी अश्शिल व घाणरेडे भाष्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची सखोल चौकशी करून शासकीय सेवेतून निलंबित करण्याची मागणी सकल मराठा समाज घनसावंगी यांच्यावतीने गुरूवार (ता.१५) रोजी घनसावंगीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अश्शिल व अतिशय घाणरेडे भाष्य केलेले आहे.यामुळे महाराष्ट्रातील मराठा बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.अशा या निच वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन करण्यास त्यांनी भाग पाडले आहे.मराठा समाजाबद्दल भाष्य केलेल्या संभाषणाची आडीयो क्लीप सर्वत्र पसरलेली असून यामुळे मराठा समाजाचा अवमान झालेला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना कडक शासन करावे,व शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावेत नसता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवल्यास प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर ज्ञानेश्वर उढाण, किशोर मरकड, राज देशमुख,गोपाल राजूरकर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.