मुर्ती चोरीप्रकरणी आ.टोपे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांची भेट !
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील सहा मुर्ती चोरी झाल्या आहेत. या घटनेला तब्बल दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे.तरी अद्यापही पोलिसांना चोरीचा सुगावा लागलेला नाही. मुर्तीचा चोरीचा तपास वेगळ्या पद्धतीने करावा व आवश्यक त्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व पोलीस महासंचालक यांची बुधवार (ता.१२) रोजी माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे,समर्थ वंशज भुषण स्वामी,सरपंच बाळासाहेब तांगडे,उपसरपंच अरविंद पवार,सचिव संजय तांगडे,राजकुमार वायदळ,अनंता तांगडे,युवराज आर्दड,दिपक तांगडे,प्रवीण तांगडे, प्रसाद पाठक यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांनी लवकरच मुर्ती चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असे आश्वासन दिले.