घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
पिंपरखेड येथे मोफत आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु.येथे माजी आरोग्यमंत्री आ.राजेश टोपे यांच्या सहकार्याने व डॉ आशिष राठोड यांचे नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरखेड बु.परीसरातील नागरीकांसाठी उद्या दि.16 ऑक्टोंबर 22 वार रविवार रोजी मोफत आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात शुगर, बीपी,ईसीजी, स्त्रीयांचे आजार, हाडांचे आजार, ह्दयाचे आजार,व मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.व मोतीबिंदू शस्त्रक्रिया लॉयन्स हॉस्पिटल औरंगाबाद येथे होणार आहेत.या शिबिराचा गरजू रूग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती भागवत रक्ताटे यांनी केले आहे.