राणीउंचेगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन पीक विमा मंजूर करावा
कुलदीप पवार/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव महसूल मंडळात गेल्या दहा दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून या महसूल मंडळातील खरीप पिके वाया गेली आहे. तसेच मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच विमा कंपनीने राणी उंचेगाव महसूल मंडळाला विमा दिलेला नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून पिक विमा देण्यात यावा अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य रामेश्वर वाडेकर यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या निवेदनावर रामेश्वर वाडेकर, परमेश्वर बोरकर, सोमनाथ वाडेकर, बळीराम वानखेडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.