घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव येथे बैठकीचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे चोरी,गोळीबार,अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असून मागील महिना दोन महिन्यापूर्वीच समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे श्रीराम मंदिरातील देवघरातील मुर्त्या चोरी होणे असे प्रकरणे घडत असताना याअनुसंघाने संदर्भित घटनांना रोखण्यासाठी सुरक्षा व दक्षतेच्या पार्श्वभूमीवर कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी महासंघाच्या वतीने दि.१ नोव्हेंबर वार मंगळवार रोजी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठकीस घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील बैठकीस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यापारी महासंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.