घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घनसावंगी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीची रणधुमाळी;18 डिसेंबरला मतदान
राज्यातील ग्रामपंचायतीच्या ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपलेल्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज दि.9 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे.यामध्ये घनसावंगी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या समावेश असून डिसेंबर महिन्यात या निवडणूकीची रणधुमाळी पार पडणार आहे.18 नोव्हेंबर तहसीलदार निवडणूकीची नोटिस जाहीर करणार आहे.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 ही उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करायची मुदत आहे.दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार 20 डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे.आज दि.9 नोव्हेंबर 2022 पासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.निवडणूका जाहिर झाल्याने गावपुढारीत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.