जालना क्राईम

थरकाप उडवणारी घटना:१४ वर्षीय मुलीने वार करून चिमुकल्या बहिणीचा खून जालन्यातील घटना

images (60)
images (60)

जालना : एका १४ वर्षांच्या चुलत बहिणीने ब्लेडने वार करून पाच वर्षांच्या चिमुकलीचा बाथरूममध्ये खून केल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील चौधरीनगर येथे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ईश्वरी रमेश भोसले (५ वर्षे, रा. चौधरीनगर) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

ईश्वरीचे आई – वडील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे राहतात. शिकण्यासाठी आई- वडिलांनी तिला जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणाऱ्या काकाकडे पाठविले होते. काही दिवसांपूर्वीच तिचा घराजवळच असलेल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश झाला होता. तिचे काका – काकू तिला दररोज शाळेत सोडत होते. सोमवारी सकाळी ईश्वरीचे काका गणेश भोसले हे घनसावंगी येथे गेले होते. घरी का मीरा भोसले, १४ वर्षांची बहिणी व एक लहान मुलगा होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ईश्वरी ही आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली, तर तिची काकू मीरा भोसले या स्वयंपाक करीत होत्या. तेवढ्यात तिची चुलत बहिणी बाथरूममध्ये गेली. तिने आतून कडी लावून ईश्वरीच्या चेहरावर, मानेवर, हातावर व गळ्यावर ब्लेडने वार केले.

तेवढ्यात ईश्वरीचा आवाज आला. तिच्या काकूने बाथरूमकडे धाव घेतली. लहान मुलगाही रडत होता. परंतु, दरवाजा लावलेला असल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. काही वेळाने त्या अल्पवयीन मुलीने दरवाजा उघडला.
त्यानंतर शेजारच्या एका तरूणाने ईश्वरीला तत्काळ खास रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मयत ईश्वरी याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि. संभाजी वडते, वसंत धस, कृष्णा भंडागे, किशोर जाधव, सय्यद मजिद घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ईश्वरीला ठार करून तिने ब्लेड टॉयलेटच्या भांड्यामध्ये टाकून दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!