
औरंगाबाद, दि.6(प्रतिनिधी)
6 डिसेंबर 1992 साली अयोध्या येथील बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेमुळे देशात दंगली भडकल्या होत्या. देशातील शांतता भंग झाली होती. अनेकांचे या घटनेत जीव गेला. मालमत्तेचे नुकसान झाले. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याला मुस्लिम समुदायाने मान्य केले. पण भविष्यात अशी घटना देशात घडू नये. कोणत्याही समाजाच्या धार्मिक स्थळाला नुकसान होईल असले कृत्य घडू नये याची दक्षता सरकार व प्रशासनाने घ्यावी या मागणीचे निवेदन आज दुपारी एमआयएमच्या वतीने शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांना सादर केले.
देशातील कलम १९५१ नुसार मस्जिद किंवा धार्मिक स्थळ विषयी वर कोणतेही नुकसान होवू नये यासाठी दक्षता घेतली जावी. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, मा.नगरसेवक नासेर सिद्दीकी, अयूब जागिरदार, शेख अहेमद, दादासाहेब काकडे, प्रांतोष वाघमारे, रफीक खान, आरेफ हुसेनी, सुभाष वाघुले, संदीप सरीन, शेख शोएब, सिराज सौदागर, शेख अक्रम, वसिम अहेमद, मुश्ताक सलामी, जिया राजा, सय्यद अजिम, नुसरत खान, सय्यद सिराज, मतीन खान, आवेज दुर्राणी, एम.एम.शेख, राफे अहेमद, मोनिका मोरे आदी उपस्थित होते.