पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्षअशोक देडे मराठवाडा दौऱ्यावर

लातूर: महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष श्री. गोविंद वाकडे यांच्या सुचनेनुसार आणि सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री अशोक देडे मराठवाड्यातील संपादक, पत्रकार, छायाचित्रकार, मुक्त पत्रकार आदींच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पत्रकार संघाचे संघटन बांधणीसाठी 11 फेब्रुवारीपासून मराठवाडा दौऱ्यावर निघत आहेत.
श्री देडे हे संघटनेच्या वाढीसाठी आणि सदस्य नोंदणीसाठी सध्या मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात दौरा करणार असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, पत्रकारांच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ राज्यभर उभारणार आहेत. त्यानुसार मराठवाड्यातील छ. संभाजीनगर येथील पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात 11 फेब्रुवारी रोजी पदग्रहण स्वीकारून ते विभागातील बैठकीत काही पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त व फेरनिवडी ही करणार आहेत
,अशी माहिती लातूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अफसर कारभारी यांनी दिली आहे.