घनसावंगी तालुकाजालना जिल्हादिवाळी अंक २०२१

विरेगव्हाण तांडा ग्रामपंचायतीत तीस वर्षांपासून चा गड ढासळला;सरपंचपदी रामराव राठोड १७५ मताधिक्याने विजयी

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील ग्रामपंचायतीवर मागील सलग तीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते.मात्र यावर्षी परिवर्तन ग्रामविकास अपक्ष पॅनलने बाजी मारली असून सरपंचपदी रामराव धनसिंग राठोड हे तब्बल १७५ मताधिक्याने दणदणीत विजयी झाले आहे.या निवडणुकीत ग्रामविकास परीवर्तन पॅनलनच्या सरपंचपदासह सहा जागा मिळाल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत समर्थ ग्रामविकास पॅनलला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले.दरम्यान निवडणुकीचा निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करून गावातून ढोल ताषाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.सदस्य म्हणून वामन उत्तम राठोड, लताबाई लक्ष्मण पवार, अनिता कैलास राठोड,बेबी आबा चव्हाण,नितेश ज्ञानेश्वर राठोड विजयी झाले आहे.तर अविद्या मच्छिंद्र पवार यांना समसमान मते पडल्याने त्यांनी चिठ्ठीवर विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीचे महादेव नानासाहेब निचळ हे एकमेव सदस्य म्हणून विजयी झाले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!