चिमुकल्यांनी वेधले उपस्थितांचे लक्ष : डी बी एस इंग्लिश स्कुल व प्रोग्रेस अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
घनसावंगी प्रतिनिधी : नितिन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील डी बी एस इंग्लिश स्कुल व प्रोग्रेस अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा कला गुणांचा अविष्कार मंगळवारी (ता.21) रोजी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात दिसून आला.
श्री समर्थ बहुुद्देशिय सेवाभावी संस्था राजा टाकळी संचलित डी बी एस इंग्लिश स्कूल व प्रोग्रेस अकॅडमी कडून आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री महंत 1008 गणेशानंद सरस्वती , अध्यक्ष सरपंच डिगांबर आर्दड,प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ सूर्यवंशी सर,डॉ प्रो दिलीप अर्जुने सर, हंसराज मोरे सर, रवी अग्रवाल साहेब, रोहिमल सर, नवल सर, ,प्रमुख उपस्थिती उपसरपंच विष्णुपंत आर्दड, पोलीस पाटील तुकाराम आर्दड, भादली सरपंच शुभम तौर, शिवणगाव सरपंच विजयकुमार तौर, उक्कडगाव सरपंच परमेश्वर तौर , रो ह यो अध्यक्ष रवींद्र आर्दड ,सामाजिक कार्यकर्ते राजे आबा तौर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध प्रकारची लोकनृत्ये सादर करण्यात आली. विविध प्रकारचे नृत्याविष्कार व छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नाटिका,देशभक्तीवर आधारित नृत्य सादर करून विद्यार्थी कलाकारांनी सोहळ्याची रंगत वाढविली. शालेय विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास व सांघिक भावना वाढावी तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांची ओळख लोककलेच्या माध्यमातून रुजवावी यासाठी या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शाळेचे शिक्षक व संचालक भागवत राऊत,दिनेश व्यवहारे, सचिन देवकर, मुख्याध्यापक ऋषीकेश वरखडे, शिक्षक महेश आर्दड, सौरभ टोमपे, सौ अर्चना आदमोरे, कु गीता तौर, सेवक अशोक नाईकनवरे, सौ गुंफाबाई यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा आर्दड यांनी केले.