घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगावात विकास कामांचा प्रारंभ

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे विविध विकास कामांचा प्रारंभ तसेच झालेल्या कामांचे लोकार्पण शनिवारी (ता.२५) माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये रांजणी-कुंभार पिंपळगाव ते राजाटाकळी या ३९ कि.मी पर्यंतच्या ३०० कोटी रूपयांचा सिमेंट रस्ता, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सिमेंट रस्ता, सभामंडप, जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ९५ लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना, भुमिगत गटार नाली आदी कामांचा समावेश आहे. विकासकामांचा दर्जा चांगला राखला जाईल यासाठी अधिकारी व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना श्री. टोपे यांनी दिली.संधीचा सोने करणे म्हणजेच विकास करणे हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच ऊसाच्या संदर्भात कारखाना कधीही राजकारण करणार नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.यावेळी सरपंच प्रतिनिधी गंगाधर लोंढे,आबासाहेब राऊत, रविंद्र तौर, भागवत रक्ताटे, रघुनाथ तौर, कल्याण सपाटे,नानाभाऊ उगले,रविंद्र आर्दड, दिलीप राऊत, लक्ष्मणराव जाधव,भागवत सोळंके, बन्शीधर शेळके,अजिमखान पठाण,दत्तात्रय कंटुले,गणेश आर्दड, अनवर पठाण नाजेम पठाण,सिद्धार्थ गाढे,एकनाथ चव्हाण यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गणेश कंटुले यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!