घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगावात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन
कुंभार पिंपळगाव्/कुलदीप पवार
‘मोदी आडनावांची मंडळी चोर असतात.असे आक्षेपार्ह विधान करून ओबीसींचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शनिवारी (ता.२५) भाजपच्या वतीने निर्देशन करत आंदोलन करण्यात आली.दरम्यान,राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून ओबीसींचा अपमान केला आहे.त्यांनी जनतेची माफी मागावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ नेते सुनील आर्दड,उपजिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, अंकुशराव बोबडे,विष्णू जाधव,शिवाजीराव कंटुले,गंगाधर लोंढे,रघुनाथ ताठे,एकनाथ राठोड,दत्ता सुराशे,राजेश तौर,रमेश काळे, दत्तात्रय शिंदे,द्वारकाताई मेहेत्रे, सरपंच संगिता लोंढे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.