आजच्या तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे-राजेंद्र महाराज सरवदे
विरेगव्हाण तांडा अखंड हरीनाम सप्ताह:पहिले किर्तनरूपी पुष्प
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
आजच्या युगात तरूणांमध्ये व्यसनांधीनतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत चाललेली असून व्यसनांमुळे विविध आजार जडत आहे.त्यामुळे तरूणांनी व्यसनांपासून दूर राहून अध्यात्मतेचा मार्गाकडे वळले पाहिजेत,असे मत ह.भ.प.राजेंद्र महाराज संकनपुरीकर यांनी व्यक्त केले.घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे सोमवारी (ता.१०) पासून सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीच्या किर्तनरूपी पुष्प गुंफताना ते बोलत होते.संत निळोबाराय यांच्या
नाम वाचे श्रवण किर्ती | पाऊले चित्ती समान ||
काळ सार्थक केला त्याने |
धरीला मनी विठ्ठल ||
या चार चरणांच्या अभंगावर निरूपण करतांना ह.भ.प. राजेंद्र महाराज संकनपुरीकर म्हणाले की,मनुष्य जीवनात कोणतेही वाईट कर्तव्य करू नका,स्वकर्तुत्वाची जाण म्हणजेच सुखाची वाटचाल समजावी.आपले आई- वडील हेच आपल्यासाठी तिर्थक्षेत्र असून त्यांची जीवंतपणी सेवा करावी.ज्या मनुष्यांना सुख हवे आहे,त्या व्यक्तिंनी आपल्या जीवनातील योग्य कर्तव्याला कधीही विसरता कामा नये,जीवनातील योग्य संगती,योग्य विचार,योग्य ज्ञान,हे माणसाला सुख मिळवून देते.आज कालच्या काळात तरूणांमध्ये दारू,तंबाखू,सिगारेट अशा व्यसनतेच्या प्रमाणात वाढ होत चालली असून व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे.त्यामुळे तरूणांनी व्यसनांपासून दूर राहून अध्यात्मतेचा मार्ग धरावा. व नव तरूणांनी कर्तृत्वपणे जीवन जगावे व स्वत:ला वाईट संगतीपासून वाईट विचारांपासून वाईट व्यवसनांपासून दूर ठेवावे असे विचार महाराजांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून मांडले.
यावेळी गावातील ग्रामस्थ,नवतरूण युवक,महिला,पुरूष यांच्यासह पंचक्रोशीतील गायक,वादक,गुणीजन भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.