ब्रेकिंग बातम्यामंठा तालुका
मंठात अतिवृष्टीग्रस्त भागाची जिल्हाधिकारी पांचाळ यांनी केली पाहणी.
तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये उदयसिंह बोराडे यांनी केली विनंती श्रीकृष्ण पांचाळ यांना
मंठा :रमेश देशपांडे
मंठा तालुक्यात पावसाने हाहाकार उडवून दिला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . जिल्हाधिकारी पांचाळ यांची शिवसेना जालना शिष्टमंडळ यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी आढावा बैठक घेऊन कलेक्टरांना पंचनामेची विनंती केली होती त्या पार्श्वभूमीवर
दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मंठा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. मंठा तालुक्यातील वाडी रानमळा,पांगरी खु,केंधळी ,या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत . नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा , एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असेही यावेळी जिल्हाधिकारी जालना पांचाळ साहेब यांनी सांगितले,